For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जपा दागिन्यांची चमक

06:00 AM Oct 15, 2021 IST | Tarun Bharat Portal
जपा दागिन्यांची चमक
Advertisement

काही सोप्या गोष्टी दागिने वापरताना आणि कपाटात ठेवताना पाळल्या तर आपल्यासाठी मौल्यवान असणारा हा ठेवा जास्त काळापर्यंत जसाच्या तसा राहील!

Advertisement

  • इमिटेशन ज्वेलरी वापरताना ते दागिने परफ्युम, नेलपेंट किंवा हेअर स्प्रेपासून लांब ठेवावेत. त्यांच्या संपक ाऊत आल्या असता अशा दागिन्यांची चमक एकदम कमी होते.
  • चांदिचे दागिने लवकर काळे पडतात त्यामुळे चांदीचे दागिने मिठाच्या किंवा मिठाच्या पाण्याच्या संपर्कात येणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी.
  • दागिने वापरल्यानंतर ते परत ठेवताना चांगले पूसून स्वच्छ करून ठेवावेत.त्यांच्यात साठलेली धूळ आणि मळ यामुळे दागिन्यांची चमक कमी होऊ शकते. सोन्याचे दागिने साफ करायला डिटर्जंट पावडर, टूथपेस्ट यांचा उपयोग होऊ शकतो.मात्र चांदीसाठी केवळ टुथपेस्ट किंवा रांगोळीचा वापर करावा. मोत्याचे दागिने साफ करताना केवळ मऊ मुलायम कपडय़ाचा वापर करावा त्यांचा संपर्क अमोनियाशी येऊ देऊ नये.
  • दागिने नेहमी पुरेशा मोठय़ा बॉक्समध्ये कापूस किंवा रेशमी कपडय़ात गुंडाळून ठेवावेत.
  • दागिने घातताना कधीही आरशासमोर उभे राहून घालू नयेत. त्यांतील कानातल्याच्या फिरक्या खाली पडून हरवण्याची किंवा दागिने खाली पडून खराब होण्याची भीती असते.सोफा किंवा बेडवर बसून छोटा आरसा समोर घेऊन दागिने घालावेत.
  • दागिने घालण्याआधी मेकअप पूर्ण करावा. मेकअपचा थर लागून दागिने खराब होण्याचा संभव असतो.
  • सोन्याचे आणि चांदीचे दागिने एकत्र कधीच ठेवू नयेत. सोन्याचे दागिने ठेवताना ते कपडय़ात ठेवण्याआधी सॅलोफिन पेपरमध्ये गुंडाळून ठेवावेत. इमिटेशन ज्वेलरीबरोबर सोन्या-चांदिचे दागिने कधी ठेऊ नयेत.
  • व्यायाम करताना किंवा कोणतेही काम करताना घाम येण्याची शक्यता असल्यास दागिने घालणं टाळावं.
  • पावसाळ्यात दागिने ओलसरपणा किंवा दमटपणामुळे खराब होण्याची शक्यता असते, अशावेळी दागिन्याच्या पेटीत एक सिलीकॉन पिशवी जरूर ठेवावी.
Advertisement
Tags :

.