For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घोषणा 8 रुपयांची; प्रत्यक्षात 12 रुपयांपर्यंत वाढ

06:10 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
घोषणा 8 रुपयांची  प्रत्यक्षात 12 रुपयांपर्यंत वाढ
Advertisement

नंदिनी दूध अन दह्याच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यात नंदिनी दूध आणि दह्याच्या दरवाढीचा मुद्दा चर्चेत आला असून सरकारने जाहीर केलेल्या दरवाढीपेक्षा प्रत्यक्ष बाजारातील दर अधिक असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे. कर्नाटक दूध महासंघाने (केएमएफ) 1 नोव्हेंबरपासून नंदिनीच्या विविध प्रकारच्या दूध आणि दह्याच्या किमतीत वाढ लागू केली आहे. दुधाच्या दरात प्रतिलिटर 8 ऊपयांपर्यंत तर दह्याच्या दरात प्रतिलिटर 14 रुपयांपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात काही प्रकारच्या दुधाच्या किमतीत 12 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

Advertisement

सरकारने सामान्य टोन्ड दुधाच्या दरात प्रतिलिटर 8 ऊपयांची वाढ केली असून त्यापैकी 7 रुपये थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना दिलासा मिळणार असला तरी सर्वसामान्य ग्राहकांच्या घरगुती खर्चात वाढ होणार आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर ग्राहकांनी दरवाढीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने 8 रुपयांची दरवाढ जाहीर केली असताना काही प्रकारच्या दुधाच्या किमतीत प्रतिलिटर 12 रुपयांनी वाढ झाल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

दह्याच्या दरातही वाढ

सुधारित दरपत्रकानुसार, दुधाचा प्रतिलिटर दर 52 रुपयांवरून 64 रुपये करण्यात आला आहे. तर होमोजिनाइज्ड दुधाचा दर 53 रुपयांवरून 65 रुपये झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत. दुधाबरोबरच नंदिनी दह्याच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. अर्धा लिटर दह्याचा दर 28 रुपयांवरून 34 रुपये करण्यात आला असून त्यात 6 रुपयांची वाढ झाली आहे. तर एक लिटर दह्याचा दर 54 ऊपयांवरून 68 रुपये करण्यात आला आहे. म्हणजेच प्रतिलिटर दह्यामागे 14 रुपयांची वाढ झाली आहे.

केएमएफकडून दरवाढीचे समर्थन

कर्नाटक सहकारी दूध उत्पादक महासंघाच्या (केएमएफ) माहितीनुसार, दुधातील पॅटच्या प्रमाणानुसार विविध प्रकारच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 8 ते 12 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळात चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दूध उत्पादक शेतकरी, दूध संघांचे प्रतिनिधी आणि केएमएफच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक घेतली होती. या बैठकीत दूध उत्पादकांना योग्य मोबदला मिळावा आणि दूध व्यवसायाला आर्थिक आधार मिळावा, यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर दूध आणि दह्याच्या दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.