गोल्डी बराडवर अमेरिकेचे 10 कोटीचे इनाम
06:22 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वॉशिंग्टन : अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयने गँगस्टर सतिंदरजीत सिंह उर्फ गोल्डी बराडला टॉप 10 मोस्ट वाँटेडच्या यादीत सामील केले आहे. बराडविषयी माहिती देणाऱ्याला 10 लाख डॉलर्सपर्यंतचे (सुमारे 10 कोटी रुपये) इनाम देण्याची घोषणा करण्यात आली आहे. बराडला लॉरेन्स ऑर्गनाइज्ड क्राइम ग्रूपचा उत्तर अमेरिकेतील प्रमुख ऑपरेशन लीडर ठरविण्यात आले आहे. लॉरेन्स आणि गोल्डी बराडवर 2023 साली खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे.
Advertisement
Advertisement