कराराचा तडका, टेक्स्टाइल समभागांना अप्पर सर्कीट
06:37 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
अमेरिकेने भारतासोबत व्यापार करार अंतिम केला असून 18 टक्के इतके शुल्क आकारण्याचे नव्याने घोषीत केल्याने शेअरबाजाराने उसळी घेण्याची संधी दवडली नाही. विशेषत: कापड म्हणजेच टेक्स्टाइल क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांना मंगळवारी अप्पर सर्कीट लागलेले दिसून आले. टेक्सटाइल कंपन्यांचे समभाग एनएसईवर 20 टक्क्यांवर वाढले होते. गोकालदास एक्सपोर्ट, कायटेक गारमेंटस्, ट्रीडेंट व केपीआर मिल यांचे समभाग वरीलप्रमाणे वाढले होते. सोबत अरविंदचे समभाग 19 टक्के तर अलोक इंडस्ट्रिजचे 12 टक्के वाढले होते.
Advertisement
Advertisement