For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूर : विजेच्या धक्क्याने सांगरुळातील तरुणाचा मृत्यू

08:20 PM Aug 13, 2020 IST | Abhijeet Khandekar
कोल्हापूर   विजेच्या धक्क्याने सांगरुळातील तरुणाचा मृत्यू
Advertisement

प्रतिनिधी / सांगरुळ

Advertisement

सांगरुळ येथील तानाजी शिवाजी वागवेकर (वय ३७ ) हा युवक लोखंडी पाईप घेऊन येत असताना त्यांच्या हातातील पाईपचा स्पर्श विजेच्या तारेला झाला. यावेळी त्याला विजेचा जोराचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला.या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तानाजी नागवेकर हा आपल्या घरातील कामासाठी लोखंडी पाईप घराबाहेर घेऊन येत असताना त्या पाईपचा स्पर्श वीज वहिनीला झाला. शॉकचा झटका बसल्याने तानाजी बाजूला फेकला गेला. यावेळी तो बेशुद्ध पडला असता तिथे असणाऱ्या लोकांनी त्याला उपचारासाठी नेले. दरम्यान उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.