For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘कोरोना’च्या भीतीने हय़ुंदाईचा सर्वात मोठा कार प्रकल्प बंद

08:46 PM Feb 07, 2020 IST | Tarun Bharat Portal
‘कोरोना’च्या भीतीने हय़ुंदाईचा  सर्वात मोठा कार प्रकल्प बंद
Advertisement

वृत्तसंस्था/ सेऊल

Advertisement

सध्या चीनमधील कोरोनाच्या विषाणूच्या संसर्गाचा वाढता प्रसार जनजीवन विस्कळीत करण्यासोबतच मोठय़ा मोठय़ा उद्योगावरही परिणाम करत आहे. लहान मोठे पार्टची निर्मिती करणाऱया जगातील सर्वात मोठय़ा कार प्रकल्पावर नकारात्मक परिणाम झाला आहे. हा प्रकल्प दक्षिण कोरीयात हय़ुंदाई कंपनीचा उल्सानमधील कार्यरत असणारा बंद केला आहे. उल्सान या ठिकाणी पाच प्रकल्प एकत्रित आहेत. या प्रकल्पामधून वर्षाला 14 लाख यूनिटची वाहन निर्मिती करण्यात येते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या प्रसारणामुळे चीनमधील काही प्रकल्प ठप्प पडले आहेत. कोरोनाची लागण आतापर्यंत 31 हजार तर 636 जणांचा या विषाणूमुळेच मृत्यू झाला आहे.

कर्मचाऱयांना पाठविले रजेवर

Advertisement

हय़ुंदाई कंपनीच्या संपूर्ण दक्षिण  कोरियातील प्रकल्पामधील तब्बल 25 हजार कर्मचाऱयांना जबरदस्तीने सुट्टीवर पाठवावे लागले आहे.

हय़ुंदाईचे 5 दिवसातील नुकसान

पाच दिवसांमध्ये काम बंद ठेवल्यामुळे तब्बल 50 कोटी डॉलरचे नुकसान कंपनीला झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रभाव फक्त एकटय़ा हय़ुंदाईवर पडला आहे असे नाही तर कियाचेही तीन प्रकल्प बंद ठेवण्यात येणार असून फ्रान्सची कंपनी रेनों ही आगामी आठवडय़ात दक्षिण कोरीयातील प्रकल्प बंद ठेवणार आहे.

Advertisement
Tags :

.