For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘कोरोना’च्या भीतीने पुन्हा बाजारात घसरण

08:47 PM Jan 28, 2020 IST | Tarun Bharat Portal
‘कोरोना’च्या भीतीने पुन्हा बाजारात घसरण
Advertisement

जागतिक स्तरावर नकारात्मक प्रभाव : निफ्टी 12,055.88 वर बंद

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवडय़ातील सलग दुसऱया दिवशी चीनमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रसारण होत असणाऱया ‘कोरोना’ विषाणूच्या धास्तीने जागतिक पातळीवर मोठय़ा प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर याचा नकारात्मक परिणाम जगातील व देशातील  शेअर बाजारासह सलग दुसऱया दिवशी मंगळवारी घसरणीसह बंद झाला आहे.

Advertisement

दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्स 463 अंकानी कार्यरत राहिला होता. परंतु अंतिम क्षणी मात्र सेन्सेक्स 188.26 अंकानी घसरुन निर्देशांक 40,966.86 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 63.20 अंकाच्या घसरणीसह निर्देशांक 12,055.80 वर बंद झाला आहे. 

दिग्गज कंपन्यांमध्ये भारती एअरटेलचे समभाग सर्वाधिक 4.55 टक्क्यांनी घसरले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी, आयटीसी, नेस्ले इंडिया आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला एचडीएफसी, बजाज फायनान्स, सन फार्मा आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग 1.53 टक्क्यांनी वधारले आहेत.

जागतिक गुंतवणूकदार चिंतेत

सध्या चीनसह अन्य देशांमध्ये कोरोना विषाणूच्या धास्तीने शेअर बाजारात गुंतवणूक करण्याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून चीनसोबत अन्य देशातील अर्थव्यवस्थेवर याचा मोठा प्रभाव निर्माण झाला असल्याचे शेअर बाजारातील तज्ञांनी म्हटले आहे. दुसऱया बाजूला भारतात मात्र कोरोना विषाणू आणि लवकरच केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणा अगोदर शेअर  बाजारात दबावाचे वातावरण तयार होत आहे.

या कारणांमुळे आगामी काळात शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावध भूमिका गुंतवणूकदार घेण्याचे संकेत असून दिलासा देणाऱया घोषणा अर्थसंकल्पात झाल्यास पुन्हा शेअर बाजार तेजीत कार्यरत  राहण्याचे संकेत तज्ञांनी व्यक्त केले आहेत.

Advertisement
Tags :

.