‘कोरोना’च्या धास्तीने टोयोटा प्रकल्प बंद ठेवणार
08:42 PM Jan 29, 2020 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
टोकिओ
Advertisement
जपानमधील कार निर्मिती करणारी टोयोटो कंपनी कोरोना विषाणूच्या धास्तीने कंपनीचे चीनमध्ये सध्य स्थितीत असणारे सर्व प्रकल्प येत्या 9 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. कोरोना विषाणू हा चीनमध्ये सर्वात वेगाने पसरत आहे. या विषाणुमुळे आतार्पंत 130 जणांचा मृत्यू झाला आहे. खबरदारीचा भाग म्हणून कंपनी स्थानिक आणि क्षेत्रीय सरकारकडून सादर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार कंपनी येत्या 9 फेब्रुवारीपर्यंत आपले प्रकल्प बंद ठेवणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी कंपनी त्यावेळची स्थिती लक्षात घेऊन प्रकल्प सुरु ठेवण्याचे की नाही याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे. टायोटा मोटार कंपनी लिमिटेड, तियांजिन एफडब्लू टोयोटा मोटार आणि सिचुआन एफएडब्लू टोयोटा कंपनी बंद राहण्याचे संकेत आहेत.
Advertisement
Advertisement