For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केनियात धरण फुटले, 40 जणांचा मृत्यू

06:56 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
केनियात धरण फुटले  40 जणांचा मृत्यू
Advertisement

अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 100 हून अधिक बळी : परिस्थिती नियंत्रणाबाहेर

Advertisement

वृत्तसंस्था/ नैरोबी

आफ्रिकन देश केनियाच्या पश्चिमेकडील भागात धरण फुटल्याने किमान 40 जणांचा मृत्यू झाला आहे. धरण फुटल्यानंतर पुराचे पाणी घरांमध्ये घुसले आणि मुख्य रस्त्यावरील वाहतूकही बंद झाली. महापुरामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर असून लोकांना मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

केनियामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे आतापर्यंत 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातच सोमवारी सकाळी ग्रेट रिफ्ट व्हॅली प्रदेशातील माई महिऊ भागात असलेले जुने किजाबे धरण फुटून मोठी दुर्घटना घडली. धरण फुटल्यानंतर पाणी खालच्या दिशेने वाहू लागल्याने बाधित क्षेत्रातील घरे आणि शेतीची प्रचंड हानी झाली. अनेक घरे पाण्याखाली गेली असून ग्रेट रिफ्ट व्हॅली प्रदेशात अचानक पूर येण्याचा धोका कायम आहे.

अनेक भाग पुराच्या विळख्यात

केनियामध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे देशातील अनेक भागात भीषण पुराचा तडाखा बसला आहे. केनियाचा जवळपास निम्मा भाग सध्या पुराच्या विळख्यात सापडला आहे. पुरामुळे लाखो लोक बाधित झाले आहेत. रस्ते, गल्ल्या आणि लोकांची घरेही पाण्याखाली गेली आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहने पाण्यात बुडालेली दिसत आहेत. जनजीवन विस्कळीत झाले असून लोकांपर्यंत मदत पोहोचवणेही अवघड झाले आहे.

नैरोबीमध्येही भयावह परिस्थिती

केनियाची राजधानी नैरोबीमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक रस्ते बंद झाले असून अनेक भागात पाणी साचले आहे. नैरोबीची परिस्थिती अत्यंत भयावह बनली असून सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. सरकार मदत आणि बचावकार्यात सर्व संसाधने वापरत आहे. परंतु परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. सर्वात त्रासदायक बाब म्हणजे जून महिन्यापर्यंत पाऊस पडण्याची शक्मयता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. केनियामध्ये मार्च महिन्यापासून पाऊस पडत आहे. मात्र सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस लोकांसाठी त्रासदायक ठरला आहे.

Advertisement
Tags :

.