For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार्थीचा ‘सरदार’ लवकरच झळकणार

06:46 AM Jul 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
कार्थीचा ‘सरदार’ लवकरच झळकणार
Advertisement

पीएस मिथ्रन यांच्याकडून दिग्दर्शित ’सरदार 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. या चित्रपटात कार्थी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित ‘सरदार’ चित्रपटाचा सीक्वेल आहे. कार्थीने या चित्रपटाची झलक दाखवत एक व्हिडिओ पोस्ट करत हा 10 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.

Advertisement

या व्हिडिओत कार्थी हातात बंदूक घेऊन उभा असल्याचे आणि त्याच्यामागे काही स्फोट होत असल्याचे दिसून येते. या व्हिडिओत कार्थीने चित्रपटातील स्वत:च्या दोन भूमिकांपैकी एक एजंट सरदार म्हणजेच चंद्र बोसच्या रुपात दाखविली आहे. कार्थी चित्रपटात विजय प्रकाश नावाची युवा भूमिकाही साकारत आहे.

कार्थीची तेलगू भाषिक राज्यांमध्ये चांगली फॅन-फॉलोइंग आहे. कार्थीच्या चित्रपटाला विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा चित्रपट ‘रणबाली’शी प्रतिस्पर्धा करावी लागणार आहे. हा चित्रपट 11 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर त्यापूर्वी टॉक्सिक हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्याच्याशीही बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करावी लागेल.

Advertisement

सरदार 2 या चित्रपटाची पटकथा रत्ना कुमार, आशामीरा, अय्यप्पन, विग्नेश मुनियांडी यांनी लिहिली आहे. चित्रपटात कार्थी आणि राजिका विजयन मागील चित्रपटातील भूमिकांमध्ये दिसून येतील. तर एसजे सूर्या, मालविका मोहनन आणि आशिका रंगनाथ देखील यात दिसून येणार आहेत.

Advertisement
Tags :

.