For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसबीआय फंड आयपीओला दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद

06:47 AM Jul 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
एसबीआय फंड आयपीओला दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद
Advertisement

वृत्तसंस्था मुंबई 

Advertisement

एसबीआय फंड्स मॅनेजमेंटचा आयपीओ 14 जुलै रोजी खुला झाला असून बुधवारी दुपारी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आयपीओ 2.69 पट सबस्क्राईब झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिटेल गुंतवणूकदारांनी 1.65 पट, संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1.42 पट आणि बिगर संस्थात्मक गुतंवणूकदारांनी 6.23 पट सबस्क्राईब केला आहे. कंपनीने आयपीओसाठी समभागाची इशु किंमत 545 ते 574 रुपये समभाग निश्चित केली आहे.

9813 कोटी उभारणार

Advertisement

सदरच्या आयपीओच्या माध्यमातून एसबीआय फंड मॅनेजमेंट 9813 कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओत ऑफर फॉर सेल अंतर्गत रक्कम उभारली जाणार आहे. यामध्ये कंपनीचे प्रवर्तक भारतीय स्टेट बँक व अमुंडी इंडिया होल्डिंग आपली हिस्सेदारी विकणार आहेत. ऑफर फॉर सेल अंतर्गत 17.09 कोटी इतके इक्विटी समभाग विक्री अंतर्गत ठेवले जाणार आहेत. आयपीओ 16 जुलै रोजी गुंतवणुकीसाठी बंद होणार आहे.

21 रोजी समभाग सुचीबद्ध

सदरचा कंपनीचा समभाग 21 जुलै रोजी बीएसई व एनएसईवर सुचिबद्ध होऊ शकतो. पहिल्या दिवशी हा आयपीओ 0.71 पट सबस्क्राईब झाला होता. आयपीओ उघडण्यापूर्वी एसबीआय फंडने अँकर गुंतवणूकदारांकडून 2663 कोटी रुपये आगाऊ उभारले होते. कंपनीला जागतिक आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला.

Advertisement
Tags :

.