For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एलआयसी आयपीओ : कर्मचारी संघटनेचे आंदोलन

08:56 PM Feb 05, 2020 IST | Tarun Bharat Portal
एलआयसी आयपीओ   कर्मचारी संघटनेचे आंदोलन
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) यांची  कर्मचारी संघटना महासंघाकडून मंगळवारी एक तासाचा चालत जात संप पुकारला होता. शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यावर त्यामध्ये सरकारचे 100 टक्के भांडवल असणाऱया मालमत्तेची विक्री आयपीओ जाहिर करुन विकणार असल्याचे  म्हटले होते. एलआयसी मागील काही वर्षांपासून राष्ट्रनिर्मितीसाठी आपले योगदान देत आली आहे. एलआयसीकडे मूल्य सरासरी 53,211.91 कोटी रुपयाचा फंड आणि 28.28 लाख कोटी इतक्या किमतीची एलआयसीची मालमत्ता आहे. आणि व्यवस्थापनाच्या अंतर्गत जवळपास 31.11 लाख कोटी इतकी मालमत्ता 2019 मधील आर्थिक वर्षात होती अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.

देशातील सर्वात मोठी आर्थिक संस्था म्हणून कार्यरत असणारी एलआयसी कंपनीचे खासगीकरण केल्यास त्यामुळे सर्वसामान्यांचा विश्वास एलआयसी विषय डळमळीत होण्यास कारणीभुत ठरण्याची भीती असून सामाजिक आणि आर्थिक मागास असणाऱयांसाठी विमा संरक्षण देणाच्या उद्देशाचा पराभव होईल असेही  कर्मचारी संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे. एलआयसीमध्ये अधिक पारदर्शकता अणण्यास येत्या काळात लोकसहभागामुळे आणि इक्विटी बाजारातून आणखीन मजबूत होण्यास एलआयसीला मोठी मदत होणार असल्याचे राज्यअर्थमंत्री अनुराग ठाकुर यांनी यावेळी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.