For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

एअर इंडिया खरेदीची योजना : 88 वर्षांनंतर टाटाकडे एअर इंडिया?

10:17 PM Feb 04, 2020 IST | Tarun Bharat Portal
एअर इंडिया खरेदीची योजना   88 वर्षांनंतर टाटाकडे एअर इंडिया

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

एअर इंडिया एअरलाईन्सचा 88 वर्षांपूर्वी जेआरडी टाटा यांनी पाया रोवला होता. तेच पुन्हा संकटाचा सामना करणाऱया एअर इंडियाला विकत घेण्याचा अंदाज आहे. सध्या एअर इंडियाची विक्री करण्यासाठी लिलाव येत्या 17 मार्चला मागविण्याची शक्यता आहे. टाटा ग्रुप यासाठी नॅशनल कॅरिअरसाठी आपल्या दाव्यासोबत आपल्या योजनाला अंतिम रुप देण्याच्या जवळ आहे. टाटा ग्रुप सिंगापूर एअरलाईन्सला एकत्र घेत एअर इंडियासाठी लिलाव लावण्याच्या तयारीत असून दोघे मिळून हा व्यवहार करण्याचा प्रयत्न करण्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे. 

1932 मध्ये जेआरडी टाटा यांनी एअर इंडियाचा पाया घातला. आणि 1946 मध्ये यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. सुरुवातीला याचे नाव टाटा एअरलाईन्स होते. 1948 नंतर मात्र या एअर लाईन्सचे नाव एअर इंडिया असे ठेवण्यात आले.  परंतु आता नव्याने टाटा ग्रुप आपली योजना आखत असून यातून एअर आशिया इंडियामध्ये अधिग्रहण(टाटाची 51 टक्के भागीदारी) आहे.

Advertisement

लवकरच नवीन करारावर हस्ताक्षर करण्यात येणार आहेत.  यामध्ये टाटा ग्रुपने एअर आशिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस यांचे अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तर यासाठी भारतीय एव्हीएशन क्षेत्रातील फर्नांडिस यांचा मोठा समभाग राहण्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

Advertisement

Advertisement
Tags :
×

.