For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रायलच्या राजधानीत भारतीय कामगाराची हत्या

06:22 AM Jul 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
इस्रायलच्या राजधानीत भारतीय कामगाराची हत्या
Advertisement

फ्लॅटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मिळाला मृतदेह

Advertisement

वृत्तसंस्था, जेरूसलेम

इस्रायलमध्ये काम करणाऱ्या एका भारतीयाचा मृतदेह जेरूसलेमच्या कटामोन भागातील अपार्टमेंटमध्ये मिळाला आहे. 40 वर्षीय भारतीयाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे.  मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला असून ही हत्या असण्याची शक्यता असल्याचे मोरियाह पोलीस स्थानकाचे प्रमुख युवल रुवेन यांनी सांगितले आहे. पोलिसांनी शहराच्या इलात भागातून एका 31 वर्षीय इसमाला या हत्येप्रकरणी अटक केली आहे. ही हत्या वैयक्तिक वादातून झाली असावा’, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Advertisement

इस्रायमध्ये ऑक्टोबर 2024 पर्यंत जवळपास 32,000 भारतीय कामगार कार्यरत होते. नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या द्विपक्षीय कराराच्या अंतर्गत ही संख्या सध्या सातत्याने वाढत आहे. पुढील 5 वर्षांमध्ये आणखी 50 हजार भारतीय कामगारांना इस्रायलमध्ये प्रवेश मिळणार आहे. इस्रायलमध्ये भारतीय मुख्यत्वे बांधकाम आणि देखभाल क्षेत्रांमध्ये काम करतात.

Advertisement
Tags :

.