For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इमामी ग्रुप आपला व्यवसाय नुवोको विस्टासला विकणार

08:54 PM Feb 07, 2020 IST | Tarun Bharat Portal
इमामी ग्रुप आपला व्यवसाय नुवोको विस्टासला विकणार
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

इमामी ग्रुप आपल्य़ा  सिमेंट व्यवसायाची लवकरच नुवोको विस्टास कार्पोरेशन लिमिटेडला  विक्री करणार असल्याची माहिती इमामी ग्रुपने दिली आहे. ग्रुपच्या प्रमोटर कजात घट झाल्यामुळे कंपनीची विक्री करत असल्याचे म्हटले आहे. इमामी सिमेंटची खरेदीत नुवोको विस्टाससह आदित्य बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनी अल्ट्राटेक आणि स्टार सिमेंटचाही यात समावेश आहे.

इमामी सिमेंटचे एक इंटीग्रेटेड प्रकल्प आणि तीन ग्रायडिंग यूनिट आहे. कंपनीचे ऑपरेशनन्स पश्चिम बंगाल, ओडिसा, छत्तीसगढ आणि बिहारमध्ये आहे. यातून कंपनीचे वार्षिक उत्पादन क्षमता तब्बल 83 लाख टनावर राहिली आहे.

Advertisement

व्यवहार आगामी दोन-तीन महिन्यात पूर्ण करणार

इमामी आणि नुवोको यांच्यातील होणाऱया व्यवहाराला कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडियासोबत अन्य रेग्युलेटरीस मंजुरी मिळण्याची आवश्यकता आहे. यासाठी पुढील तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :

.