For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर

06:31 AM Jul 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
आशियाई क्रीडा स्पर्धेतील  क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर
Advertisement

भारतीय पुरुष आणि महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत खेळणार

Advertisement

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

Advertisement

जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेचे ड्रॉ आणि गट जाहीर करण्यात आले. भारतीय पुरुष आणि महिला संघांनी थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. यावेळी क्रिकेट स्पर्धेतील सर्व सामने जपानमधील नागोया येथे टी-20 फॉरमॅटमध्ये खेळले जातील. महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 17 ते 22 सप्टेंबर दरम्यान तर पुरुष स्पर्धा 24 सप्टेंबरपासून सुरू होईल. विशेष म्हणजे, पुरुष आणि महिला दोन्ही गटात भारतीय संघ विजेता आहे.

यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश या 4 संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. हे चारही संघ थेट उपांत्यपूर्व फेरी खेळतील. उर्वरित 4 जागांसाठी 6 संघांमध्ये पात्रता सामने होतील. दरम्यान, दोन गट असून अ गटात अफगाणिस्तान, जपान, नेपाळ आणि ‘ब’ गटात हाँगकाँग, मलेशिया, ओमान संघ आहेत. यामधील चार संघ हे उपांत्यपूर्व फेरीमध्ये जाणार आहे.

महिला गटात भारत-जपान आमनेसामने

महिला क्रिकेट स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होतील. या स्पर्धेची सुरुवात थेट उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांनी होईल. भारतीय संघ आपल्या पहिल्या सामन्यात जपानचा सामना करेल. इतर उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये श्रीलंकेचा सामना मलेशियाशी, तर पाकिस्तानचा सामना थायलंडशी होणार आहे.

आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघ -

पुरुष संघ : श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रे•ाr, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, वैभव सूर्यवंशी.

महिला संघ - हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष, जी कमालिनी, भारती फुलमाली, श्री चरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंद्धती रे•ाr, श्रेयांका पाटील (तंदुरुस्तीवर समावेश), राधा यादव, नंदीनी शर्मा

Advertisement
Tags :

.