For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आर्क्टिकमध्ये रशियाकडून तेल उत्पादन सुरू

06:08 AM Sep 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
आर्क्टिकमध्ये रशियाकडून तेल उत्पादन सुरू
Advertisement

पुतीन यांनी दाखविला हिरवा झेंडा : भारताची होर्मुझवरील निर्भरता कमी होणार

Advertisement

त् वृत्तसंस्था, मॉस्को

अमेरिका आणि युरोपीय देशांच्या निर्बंधांना भीक न घालता रशियाने आर्क्टिक भागात स्वत:च्या मोठ्या ‘वोस्तोक ऑइल’ प्रकल्पातून तेल उत्पादन सुरू केले आहे. राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पहिल्या aखेपच्या लोडिंगला हिरवा झेंडा दाखविला आहे. 2027 च्या दुसऱ्या सहामाहीत  या प्रकल्पातून वार्षिक 3 कोटी टन कच्च्या तेलाच्या उत्पादनाचे लक्ष्य रशियाने बाळगले आहे.

Advertisement

पुतीन यांचा हा प्रकल्प उत्तर सायबेरियाच्या तैमिर भागात असून यात वानकोर आणि पायाखा समवेत अनेक तेलक्षेत्रं जोडलेली आहेत. प्रकल्पाशी संबंधित वानकोरनेफ्ट कंपनीत 4 भारतीय सरकारी कंपन्यांची संयुक्त हिस्सेदारी 49.9 टक्के इतकी आहे. यात ओएनजीसी विदेश, इंडियन ऑइल, ऑइल इंडिया आणि भारत पेट्रो रिसोर्सेज सामील आहे.

या प्रकल्पातून निघणारे कच्चे तेल 790 किलोमीटर लांब पाइपलानद्वारे कारा सागरच्या बुख्ता सेवेर टर्मिनलपर्यंत पोहोचविले जाईल. तेथे ऑइल टँकरांमध्ये ते भरून इतर देशांना पाठविले जाणार आहे. कंपनीनुसार या भागात सुमारे 700 केटी टन कच्च्या तेलाचा साठा असू शकतो. रशियाकडून भारताच्या दिशेने येणाऱ्या ऑइल टँकर्सना होर्मुझ सामुद्रधुनीतून यावे लागणार नाही. याचमुळे हा प्रकल्प भारतासाठी आखाती देशांच्या तेलाचा एक नवा प्रकल्प ठरणार आहे.

रशियाच्या प्रकल्पामुळे मदत

भारत स्वत:च्या आवश्यकतेच्या सुमारे 50 टक्के कच्चे तेल होर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गाने मागवितो. जानेवारी-फेब्रुवारी 2026 मध्ये या मार्गाने भारताला प्रतिदिन सुमारे 26 लाख बॅरल कच्चे तेल प्राप्त झाले होते. हे कच्चे तेल प्रामुख्याने इराक, सौदी अरेबिया, युएई आणि कुवैतमधून प्राप्त झाले. परंतु रशियाच्या आर्क्टिक प्रकल्पानंतर भारताची होर्मुझवरील निर्भरता निम्म्यावर येईल असा अनुमान आहे.

प्रकल्पात 4.4 लाख कोटीची गुंतवणूक

प्रकल्पाशी निगडित हवाई वाहतुकीसाठी विमानतळ देखील तयार केले जात असून याची धावपट्टी 3500 मीटर लांब असणार आहे. या प्रकल्पात आतापर्यंत सुमारे 4.4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. वोस्तोक प्रकल्प बर्फाळ भागात असून सध्या तेथे 50 हजारांहून अधिक लोक काम करत आहेत.

तेलात सल्फर कमी, शुद्धीकरणाचा खर्च घटणार

वोस्तोकच्या कच्च्या तेलात सल्फर केवळ 0.01 ते 0.1 टक्के आहे. कच्च्या तेलात सल्फरचे प्रमाण कमी असल्यास त्याला पेट्रोल आणि डिझेलमध्ये रुपांतरित करणे सोपे ठरते. सल्फर कमी असल्याने ते हटविण्याचा खर्च कमी येईल, यामुळे तेल शुद्धीकरण कंपन्यांकरता हे कच्चे तेल अधिक नफा मिळवून देणारे ठरू शकते.

Advertisement

.