‘आयआयटी जम्मू’चे लेहमध्ये उपकेंद्र होणार
06:22 AM May 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ श्रीनगर
Advertisement
आयआयटी जम्मू आणि लडाख प्रशासनाने शनिवारी लेहमध्ये आयआयटी जम्मूचे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार, सुरुवातीला सिव्हिल इंजिनिअरिंग, एआय आणि डेटा सायन्ससारखे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातील. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांसाठी संशोधन, नवोपक्रम आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. लडाखचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी ‘एक्स’वर यासंबंधी माहिती दिली. सरकारने लडाखच्या तरुणांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे. केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि आयआयटी जम्मू यांच्यात लेहमध्ये सॅटेलाइट कॅम्पस स्थापन करण्यासाठी एक ऐतिहासिक करार झाल्याचे ट्विट त्यांनी केली.
Advertisement
Advertisement
