For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता नवीन ट्रक खरेदी नाही : ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर

08:21 PM May 25, 2020 IST | Tarun Bharat Portal
आता नवीन ट्रक खरेदी नाही   ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

कोविडला थोपविण्यासाठी वेगवेगळय़ा प्रकारच्या मार्गांचा अवलंब केला जात आहे. यामध्ये सर्वात प्रभावी पर्याय म्हणून जगातील सर्वच देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामध्ये भारतामधील लॉकडाऊनच्या कालावधीला 60 दिवस ओलांडून गेले आहेत. याच काळात विविध उद्योगधंद्याचे आर्थिक बजेट कोलमडून पडले आहे. यामध्ये सध्या ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट वेलफेअर असोसिएशनने चालू आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये आमचा सदस्य कोणताही नवीन ट्रक खरेदी करणार नसल्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने सादर केलेल्या आर्थिक मदतीच्या पॅकेजमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद आमच्यासाठी केली नसल्यामुळेच भविष्यातील धोके लक्षात घेऊनच हा निर्णय घेत संबंधीत सदस्यांना आम्ही सूचना कळविल्या असल्याचे स्पष्टीकरणही ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट असोसिएशने दिले आहे.

Advertisement

देशभरात 90 लाख ट्रक

देशभरात जवळपास 90 लाख ट्रक आहेत. परंतु यामधील जास्तीत जास्त ट्रकची चाके मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे थांबली आहेत. हा बंद आम्हाला थेट नुकसानीकडेच घेऊन जात असल्याचे संकेत असून, यामुळे ट्रक मालकांना रस्त्याचा कर, परमिट शुल्क आणि अन्य प्रकारच्या शुल्काची आकारणी करावी लागणार असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.