For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजार पांढऱया डागांचा

07:03 AM Jul 26, 2020 IST | Tarun Bharat Portal
आजार पांढऱया डागांचा
Advertisement

पांढरे डाग किंवा कोड हा काही भयानक विकार नाही; परंतु या पांढर्या डागामुळे व्यक्तीच्या दिसण्यात आणि त्याच्या व्यक्तीमत्त्वात फरक पडतो. त्या व्यक्तीकडे समाजाचा  बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, त्यामुळे ती व्यक्ती तणावाखाली राहते आणि शेवटी मनोरूग्ण होते. पांढर्या डागाविषयी समाजात जेवढे गैरसमज आहेत, तेवढे इतर कोणत्याही आजाराविषयी नाही. या गैरसमजामुळेच कोडपीडित व्यक्ती मनोरूग्ण होते.

Advertisement

शरीरातील त्वचेमध्ये मेलिनोसाईट नावाच्या पेशी असतात. या पेशी ‘पिगमेंट मेलानीन’ पदार्थ निर्माण करतात. या पदार्थांमुळे आपल्या त्वचेला रंग प्राप्त होतो. मेलिनोसाईट पेशींनी आपले काम थांबविल्यास त्वचेवर पांढरे ठिपके तयार होतात. पांढर्या डागाच्या जागेत असलेले केसदेखील पांढरे होतात. जगात या विकाराने साधारणतः 0.5 ते 2 टक्के लोक बाधित आहेत. पांढरे डाग सर्व वयोगटांत आढळतात. विशेषतः 20 वर्षांनंतर हे प्रमाण अधिक आढळते.

विशेष म्हणजे, अद्यापपर्यंत या विकाराचे नक्की कारण सापडले नाही. तथापि, आनुवंशिकता, ऑटोइम्यून, सूर्यकिरणे अतिप्रमाणात अंगावर घेणे आणि पर्यावरणात औद्योगिक रसायनांचे सूक्ष्म कण यांमुळे हा विकार होताना दिसतो.

Advertisement

लक्षणे कोणती?

  • त्वचा आणि केस पांढरे होणे हेच प्रमुख लक्षण आहे. तसेच तरूणपणीच केस पांढरे पडू लागतात. डोळ्यांच्या पापण्या, भुवया आणि दाढीचे केसदेखील पांढरे पडतात.
  • ओठ, गुदद्वार आणि लघवीच्या जागी जेथे आतील आणि बाहेरील त्वचा मिळतात तेथे पांढरे डाग पडतात. त्याचबरोबर काखेतील त्वचा पांढरी पडते.
  • अनेक वर्षांच्या संशोधनातून हे सिद्ध केले आहे, की हा विकार मेलानोसाईट पेशीचा नाश झाल्यामुळे होतो. या पेशींचे कार्य थांबल्यामुळे पांढरे डाग पडतात. एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या वाईट वागण्याशी याचा काहीच संबंध नाही.
  • कोड या विकाराचा कुष्ठरोग अथवा कर्करोग इत्यादी त्वचारोगांशी  अजिबात संबंध नाही. हा त्वचेचा रंग निर्माण करणार्या पेशींच्या कमतरतेमुळे होतो. या कमतरतेची नक्की कारणे सांगता येत नाहीत. कोड अजिबात संसर्गजन्य नाही. शरीरातील रक्त, लाळ, वीर्य किंवा इतर द्रव पदार्थांशी संबंध आला तरी कोड होत नाही. त्या व्यक्तीच्या वस्तू वापरल्या तरी पांढरे डाग पसरत नाही.
  • दूध आणि इतर पांढर्या रंगाच्या पदार्थांच्या सेवनाने किंवा लिंबू, संत्रे, मोसंबीसारख्या आंबट फळांच्या सेवनाने पांढरे डाग होतात, असा एक समज समाजात आढळतो. पण त्याला कसलाही शास्रीय आधार नाही. दूध, पांढरे पदार्थ आणि आंबट फळे आपल्या आहारात आवश्यक आहेत. त्त्यांचे सेवन बंद केल्यास शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. काही पदार्थांमुळे पांढरे डाग वाढतात; परंतु या दाव्याला शास्त्रीय आधार नाही
Advertisement
Tags :

.