For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आगामी लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी

06:41 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
आगामी लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी
Advertisement

गेल्या वर्षभरातील घडामोडी

Advertisement

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरुन हटविण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पुढाकार. काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव गट, द्रविड मुन्न्sत्र कळघम, राष्ट्रीय जनता दल इत्यादी पक्षांचा आघाडीत समावेश.

ड राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर अशी साधारणत: चार हजार किलोमीटरची पदयात्रा. पदयात्रेआधीच विरोधी पक्षांच्या आघाडीची स्थापना. आय.एन.डी.आय.ए (इंडियन नॅशनल डेमॉव्रेटिक इन्क्ल्यूझिर्व्ह अलायन्स) असे नाव निश्चित. बेंगळूर येथे 22 पक्षांच्या प्रमुख नेत्यांची जाहीररित्या हातमिळवणी.

Advertisement

ड राहुल गांधींच्या पदयात्रेनंतर प्रथम कर्नाटक आणि नंतर तेलंगणात काँग्रेसचा मोठा विजय. त्यामुळे काँग्रेसच्या आत्मविश्वासात वाढ. भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यासाठी पार्श्वभूमी निर्माण झाल्याचा विरोधी पक्षांचा दावा. विरोधी पक्षांच्या आघाडीसंबंधी सकारात्मक वातावरण निर्मितीचा कालावधी.

ड लोकसभा निवडणुकीच्या आधी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका घोषित. पाच पैकी चार राज्यांमध्ये काँग्रेसला होती विजयाची आशा. त्यामुळे विरोधी आघाडीचे जागावाटप या निवडणुकांच्या नंतरच करण्याचा काँग्रेसचा आग्रह. मोठा विजय मिळाल्यास काँग्रेसची बार्गेनिंग क्षमता वाढेल ही होती अपेक्षा.

ड डिसेंबर 2023 मध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांचा मोठा अपेक्षाभंग. भारतीय जनता पक्षाचा राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मोठा विजय. काँग्रेसला तेलंगणा वगळता इतरत्र मोठा धक्का. विरोधी पक्षांच्या आघाडीत काँग्रेसच्या क्षमतेसंबंधी मोठी चलबिचल.

ड ‘गोप्रदेश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसचा अपेक्षांच्या विपरीत पराभव झाल्याने काँग्रेस नेतृत्वाच्या विजयक्षमतेवरच प्रश्नचिन्ह. त्यामुळे विरोधी पक्षांच्या काँग्रेसवरील विश्वासालाही तडा. विरोधी आघाडीत फुटीची चिन्हे. ममता बॅनर्जी, नितीश कुमार, अखिलेश यादव कमालीचे नाराज.

ड नितीशकुमारांकडून विरोधी आघाडीला प्रथम दणका. बिहारमधील सरकारचा राजीनामा. नितीश कुमार यांचे भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाहीत पुनरागमन. बिहारमध्ये सत्तांतर. संयुक्त जनता दल, भारतीय जनता पक्ष आणि अन्य तीन पक्षांच्या युतीचे सरकार पुन्हा स्थापन. समीकरणे पालटली.

ड नितीश कुमार यांच्या पाठोपाठ ममता बॅनर्जींचा काँग्रेसला तडाखा. पश्चिम बंगालमध्ये एकही जागा काँग्रेससाठी न सोडण्याची घोषणा. काँग्रेसला होती किमान 4 जागांची अपेक्षा. तीन महिने चाललेल्या वाटाघाटींना ममता बॅनर्जी यांच्याकडून एकतर्फी पूर्णविराम. पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षांची आघाडी मोडली.

ड आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचाही काँग्रेसशी पंजाबमध्ये युती करण्यास नकार. केवळ दिल्लीत युती केली जाण्याची घोषणा. पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष काँग्रेसशी युती करण्यास राजी. तथापि, केरळमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात. राहुल गांधींच्या वायनाड उमेदवारीस डाव्यांचा विरोध.

ड उत्तर प्रदेशात विरोधी आघाडीत फूट. राष्ट्रीय लोकदल हा पक्ष नेते जयंत चौधरी यांच्या नेतृत्वात आघाडी बाहेर. राष्ट्रीय लोकदलाचा पुढच्या चार दिवसांमध्ये राष्ट्रीय लोकशाही अघाडीत प्रवेश. भारतीय जनता पक्षाशी युती करण्याचा निर्णय घोषित. भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रीय जनता दलाला 2 जागांचा प्रस्ताव.

ड कर्नाटकात भारतीय जनता पक्षाची निधर्मी जनता दलाशी युतीची घोषणा. भारतीय जनता पक्ष 25 तर निजद 3 जागांवर लढण्यास दोन्ही पक्षांची संमती. दोन्ही पक्षांमध्ये युतीसंबंधी काही नेते नाराज. पण बहुसंख्य नेत्यांची मान्यता. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसवासी झालेले जगदीश शेट्टर परत पक्षात.

ड आंध्र प्रदेशात भारतीय जनता पक्षाची चंद्राबाबू नायडूंच्या तेलगु देशम या पक्षाशी युती. भारतीय जनता पक्षाकडून सहा जागांवर लढण्याचा निर्णय. सिनेअभिनेते पवन कल्याण यांचा पक्षही युतीस समाविष्ट. अशा प्रकारे विरोधी पक्षांची आघाडी विस्तारित होण्याऐवजी रालोआचाच झाला मोठा विस्तार.

Advertisement
Tags :

.