For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेच्या ग्रँड कॅन्यनमध्ये अचानक पूर, 15 जण बेपत्ता

06:36 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेच्या ग्रँड कॅन्यनमध्ये  अचानक पूर  15 जण बेपत्ता
Advertisement

न्यूयॉर्क: अमेरिकेच्या ग्रँड कॅन्यन नॅशनल पार्कमध्ये अचानक आलेल्या पुरानंतर सुमारे 15 जण बेपत्ता झाले आहेत. या पूराने ब्राइट एंजेल कॅन्यन आणि फँटम रँच भागाला प्रभावित पेले आहे. कोलोराडो नदीत आलेल्या या पूरामुळे मोठी हानी झाली आहे. प्रभावित भागातून लोकांना बाहेर काढणे आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी एरिझोनाच्या अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत असे नॅशनल पार्क सर्व्हिसकडून म्हटले गेले. पावसाला सुरुवात झाल्यावर ब्राइट एंजेल क्रीकमध्ये अचानक पूराला सुरुवात झाली, हा नाला पुढे जात कोलोराडो नदीत सामावतो, तीव्र प्रवाहामुळे नाल्यावर निर्मित पादचारी पूल वाहून गेले. पूरसंकटाची जाणीव झाल्यावर सुमारे 50 लोकांना  हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. फँटम रॅँच येथून 62 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. फँटम रॅचमध्ये ऐतिहासिक कँटीन आणि राहण्यासाठी खोल्या आहेत. तसेच हे कोलोराडो नदीत राफ्टिंग करणाऱ्यांसाठीचे ठिकाण आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.