For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखनूरमध्ये बीएसएफने पकडला पाकिस्तानी घुसखोर

06:47 AM Jul 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
अखनूरमध्ये बीएसएफने पकडला पाकिस्तानी घुसखोर
Advertisement

जम्मू  :    जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात बीएसएफ जवानांनी पुन्हा एकदा सतर्कतेचे दर्शन घडत घुसखोरीचा प्रयत्न उधळला आहे. बीएसएफच्या जवानांनी मालाबेला येथील सीमाचौकीनजक पाकिस्तानच्या दिशेकडून एक संशयास्पद हालचाल टिपली. जवानांनी घुसखोराला वारंवार थांबण्याचा इशारा दिला, परंतु तो सातत्याने भारतीय सीमेच्या दिशेने येत होता, स्थितीचे गांभीर्य ओळखून बीएसएफ जवानांनी घुसखोराला ताब्यात घेतले.

Advertisement

प्रारंभिक चौकशीत या घुसखोराने स्वत:चे नाव मोहम्मद रफीक उर्फ काला (53 वर्षे) असल्याचे आणि आपण पाकिस्तानातील पिंडी गावाचा रहिवासी असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानातील लूणी गावातून निघालो होतो आणि जुंग गावातील विवाहित बहिणीला भेटण्यासाठी जात होता असे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या या दाव्याची सत्यता तपासून पाहण्यासाठी सुरक्षा दलांकडून चौकशी करण्यात येत आहे. या घुसखोराकडून पाकिस्तानी राष्ट्रीय ओळखपत्र आणि अन्य सामग्री हस्तगत झाली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.