For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवयव दानाबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती आवश्यक

07:42 AM Jul 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
अवयव दानाबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती आवश्यक
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव

सुरक्षित आरोग्य व अवयव दानाबाबत जनजागृती व्यापक स्वरुपात झाली पाहिजे. अवयवदात्यांना मार्गदर्शन झाले पाहिजे. पुणे, मुंबई, बेंगळूरप्रमाणे बेळगावातही अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक रुग्णांना माफक दरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रामुख्याने यकृत प्रत्यारोपण, अत्यल्प दरामध्ये दर्जेदार वैद्यकीय सुविधा देणे हे केएलई संस्थेच्या हॉस्पिटलचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन केएलई हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे (काहेर) कुलपती डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले.

Advertisement

जागतिक हिपॅटायटीस दिनाच्या निमित्ताने केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल-वैद्यकीय संशोधन केंद्राच्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभाग, काहेर, जे. एन. वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजीस्ट डॉ. संतोष हजारे यांनी मंगळवारी हिपॅटायटीस बी व अवयव दानाबाबत जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. पदयात्रेला डॉ. प्रभाकर कोरे यांनी हिरवे निशाण दाखवून उद्घाटन केले. याप्रसंगी ते बोलत होते.

पोलीस उपायुक्त नारायण बरमणी म्हणाले, केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल-वैद्यकीय संशोधन केंद्रामध्ये अत्याधुनिक व सुसज्जीत वैद्यकीय उपकरणे असून दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळते. आपणही येथील वैद्यकीय सेवा घेतली आहे. रुग्णांना उत्तमप्रकारे व काळजीपूर्वक उपचार मिळतात. अत्याधुनिक सेवेला येथे प्राधान्य आहे.

राणी चन्नम्मा चौकातून जागृतीफेरीला सुरुवात होऊन डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या आवारात समारोप करण्यात आला. हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. कर्नल एम. दयानंद, कुलगुरु डॉ. संदीप श्रीवास्तव, कुलसचिव डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी, जे. एम. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश पोवार, डॉ. पंचलिंगाप्पा बेटगिरी, डॉ. सुदर्शन चौगला, डॉ. बसवराज बिज्जरगी, डॉ. राजशेखर सोमनहट्टी आदींचा जागृतीफेरीमध्ये समावेश होता.

त्याऩंतर हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉ. संतोष हजारे म्हणाले, हिपॅटायटीस बी आणि सी हे यकृताशी संबंधित आजार असून जीवघेणे ठरू शकतात. वेळीच तपासणी व वैद्यकीय चिकित्सा घेतल्यास रुग्णाला आराम मिळू शकतो. हॉस्पिटलमध्ये मागील 14 वर्षांपासून हिपॅटायटीसची तपासणी करण्यात येत असते. लाखो जणांची तपासणी करून 60 टक्केपर्यंत लस देण्यात येते. पुण्यापासून बेंगळूरपर्यंतच्या मार्गावर केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्येच यकृताशी संबंधीत आजारावर उपचार करण्यात येत असतात. यकृत प्रत्यारोपणही करण्यात येते. आतापर्यंत 28 यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर, हिपॅटायटीसचा संसर्ग या संबंधी केएलई नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली.

Advertisement
Tags :

.