For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत गोळीबारात आठ जणांचा मृत्यू

06:50 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत गोळीबारात आठ जणांचा मृत्यू
Advertisement

इक्वेडोरमधील बारमध्ये वाढदिवस पार्टीवेळी घटना

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेतील इक्वेडोरमधील सांता एलिना येथील एका बारमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान गोळीबार झाला. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच पुऊष आणि तीन महिलांचा समावेश आहे. टॅक्सी आणि दोन मोटारसायकलमधून दाखल झालेल्या हल्लेखोरांनी गोळीबारानंतर घटनास्थळावरून पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले. क्विटोपासून 185 मैल (300 किलोमीटर) नैर्त्रुत्येस असलेल्या चंदुय शहरातील बारमध्ये त्यांनी गोळीबार केला.

Advertisement

सांता एलेना हे इक्वेडोरमधील सर्वात हिंसक क्षेत्रांपैकी एक आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येथील तीन बंदरांचा वापर अनेकदा अमली पदार्थांच्या तस्करीसाठी केला जातो. 2023 मध्ये इक्वेडोरमध्ये 7,600 हत्या झाल्या होत्या. 2022 मध्ये हा आकडा 4,400 होता. या वर्षात आतापर्यंत सुमारे 1,875 खून झाल्याच्या घटना नोंद झाल्या आहेत. इतर भागांच्या तुलनेत या भागात गुन्हेगारीच्या घटना अधिक घडत असतात.

Advertisement
Tags :

.