अमेरिकेकडून ‘हॅमर ऑफ द गॉड्स“ची निर्मिती
शत्रूचे जीपीएस करून टाकतो बंद
वृत्तसंस्था, मानसा
आधुनिक युद्ध जीपीएसवर मोठ्या प्रमाणात निर्भर आहे. आर्टिलरी आणि ड्रोन अचूक लक्ष्यासाठी उपग्रहीय सिग्नलची मदत घेत असतात. परंतु अमेरिका आता स्वत:च ही निर्भरता मोडून काढण्याची तयारी करत आहे. अमेरिकेच्या सैन्याने दक्षिण कॅलिफोर्नियाच्या समुद्रात पहिल्यांदाच ‘हॅमर ऑफ द गॉड्स“ नावाच्या प्रणालीचे परीक्षण केले आहे. ही प्रणली लो-सिग्नेचर एमिटर जीपीएस आणि अन्य पोझिशनिंग सिग्नलला एका क्षेत्रात जाम करून टाकते.
ही प्रणाली पारंपरिक शस्त्र नाही, हे काही क्षेपणास्त्र किंवा बॉम्ब डागत नाही. तर इलेक्ट्रॉनिक वेव्ह्ज सोडून पोझिशनिंग, नेव्हिगेशन आणि टायमिंग (पीएनटी) सिग्नल्समध्ये अडथळे निर्माण करते. लँड वर्जनचे मागील दोन वर्षांपासून परीक्षण सुरू होते. तर सागरी परीक्षण पहिल्यांदाच पार पडले आहे.
पीएनटी आधुनिक सैन्य अभियानांचा पाया आहे. याला हटविल्यास दीर्घ पल्ल्याची आर्टिलरी, दिशानिर्देशित क्षेपणास्त्रs आणि क्रूज शस्त्रास्त्रांची अचूकता संपुष्टात येते. अमेरिका स्वत: विना जीपीएस लढणे शिकू शकेल म्हणून ही प्रणाली तयारी केली जातेय. चीन आणि रशियाकडे देखील असे जॅमर आहेत. रशिया युक्रेन आणि बाल्टिक समुद्रात दररोज त्यांचा वापर करत असल्याचे उद्गार स्पेस फोर्सेस पॅसिफिकचे लेफ्टनंट कर्नल डॅरिन हॉल यांनी काढले आहेत.
क्वांटम सेंसिंगच खरा तोडगा
जीपीएस जाम करणे आता सोपे ठरले आहे. सिग्नल बंद झाल्यास नेव्हिगेशन कसे जारी रहावे याकरता खरी शर्यत असून याकरता क्वांटम तंत्रज्ञान समोर येत आहे. एटॉमिक क्लॉक उपग्रहाशिवाय वेळ योग्य राखते. मॅग्नेटोमीटर पृथ्वीच्या चुंबकीय आवरणाला नकाशाप्रमाणे वाचतो. कोल्ड एटम एक्सेलेरोमीटर मोशनला अचूकपणे ट्रॅक करू शकतो. तर जुने जाइरो डिफ्ट्र होतात. अमेरिकेच्या वायुदलाने सी-17 विमानाच्या उ•ाणात याचा वापर केला. क्यू-सीटीआरएल कंपनीने जीपीएस बंद झाल्यावरही सैन्य इनर्शियल सिस्टीमपेक्षा 50 पट अधिक अचूकता दाखविली. हॅमर ऑफ द गॉड्स जीपीएस निर्भरतेवरील कमजोरीवर प्रकाश टाकतो. तर क्वांटम सेंसिंग त्याचे उत्तर ठरत आहे. आगामी वर्षांमध्ये हे तंत्रज्ञान युद्धमैदानाचे चित्र बदलणार आहे.
