For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अफगाणचा झिम्बाब्वेवर 37 धावांनी विजय

06:38 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
अफगाणचा झिम्बाब्वेवर 37 धावांनी विजय
Advertisement

पहिल्या टी-20 सामन्यात एजाज अहमदझाई आणि रशीद खान यांची चमक

Advertisement

वृत्तसंस्था, शारजाह

अफगाणिस्तानने मंगळवारी रात्री शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा 37 धावांनी पराभव करत मालिकेत विजयी सुरूवात केली.

Advertisement

अफगाणने 177 धावा केल्या आणि त्यानंतर झिम्बाब्वेच्या संघाला 19.1 षटकांत 140 धावांत गुंडाळले. ज्यामुळे त्यांना 37 धावांनी विजय मिळाला. एजाज अहमदझाई आणि रशीद खान यांनी फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करत अफगाणला सुरुवातीच्या पडझडीतून सावरले आणि एक आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. अफगाणची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्या तीन षटकांतच त्यांनी तीन बळी गमावले. रहमानउल्ला गुरबाजने 21 चेंडूत 18 धावा केल्या तर इब्राहिम झद्रानने सहा चेंडूत 5 धावा केल्या. सिदिकुल्लाह अटल आणि मोहम्मद अक्रमही स्वस्तात बाद झाल्यामुळे अफगाणिस्तान 45 धावांवर 4 बळी अशा कठीण परिस्थितीत सापडला होता. शाहिदउल्ला कमालने 42 चेंडूत 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत डाव सावरला. त्याने 2 चौकार आणि 3 षटकार लगावले. त्याने मधल्या फळीतील फलंदाजीला आधार दिला.

त्यानंतर एजाज अहमदझाईने अवघ्या 22 चेंडूत 52 धावांची धडाकेबाज खेळी करत सामन्याचे पारडे फिरवले. अहमदझाईने चार चौकार आणि चार षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 236.36 होता. त्याने अफगाणिस्तानला अत्यंत आवश्यक असलेली गती मिळवून दिली. रशीद खानने डावाच्या शेवटी आक्रमक फलंदाजी करत 10 चेंडूत 30 धावा झोडपल्या. ज्याचा स्ट्राईक रेट 300 इतका प्रभावी होता. त्याच्या खेळीत चार षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. यामुळे 19.5 षटकांत 177 धावांत त्यांचा संपूर्ण संघ बाद झाला.

झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांना दीर्घकाळ टिकणारी भागीदारी उभारण्यात अपयश आले. ब्रायन बेनेटने 18 चेंडूत 13 धावा केल्या तर बेन करनने 8 चेंडूत 7 धावा केल्या. इनोसंट कायाने 26 चेंडूत 24 धावा करत काहीसा प्रतिकार केला. परंतु झिम्बाब्वेचे फलंदाज महत्त्वाच्या क्षणी बाद होत राहिले. रायन बर्लने 24 चेंडूत 32 धावा (दोन षटकारांसह) केल्या. जो झिम्बाब्वेसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तर कर्णधार सिकंदर रझाने 13 चेंडूत 17 धावा केल्या. वेस्ली मधेवेरेने 8 चेंडूत 17 धावांची आक्रमक खेळी केली. परंतु त्याचे हे योगदान संघाला विजयाच्या मार्गावर परत आणण्यासाठी पुरेसे नव्हते. अखेरीस, झिम्बाब्वेचा संघ 19.1 षटकांत 140 धावांवर सर्वबाद झाला आणि त्यांना 37 धावांनी पराभव पत्करावा लागला.

संक्षिप्त धावफलक : अफगाण 19.5 षटकांत सर्व बाद 177 : एजाज अहमदझाई 22 चेंडूत 52, रशीद खान 10 चेंडूत 30. झिम्बाब्वे 19.1 षटकांत सर्व बाद 140.

Advertisement
Tags :

.