अॅपलची एआयसाठी गुगल जेमिनीसोबत हातमिळवणी
नवी दिल्ली :
अॅपल आणि गुगलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत करार झाला आहे. ज्या अंतर्गत आता गुगलच्या जेमिनी एआय मॉडेल आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर अॅपलचे एआय फाउंडेशन मॉडेल तयार केले जाणार आहे. गुगल जेमिनी मॉडेल अॅपलचे नवीन सिरी आणि अॅपल कृत्रिम बुद्धिमत्ता वैशिष्ट्यो आणि अधिक चांगली असल्याचेही म्हटले आहे.
गुगलने एक्स वर पोस्ट करून या भागीदारीची घोषणा केली आहे. गुगलने सांगितले की, अॅपल इंटेलिजन्सबाबतची वैशिष्ट्यो अधिक चांगली बनवण्यासाठी आणि सिरीला आयफोन, आयपॅड आणि मॅकबुकमध्ये अधिक वैयक्तिकृत करण्यासाठी ही भागीदारी झाली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सिरीची नवीन आवृत्ती यावर्षी लॉन्च केली जाईल. या भागीदारीवर प्रतिक्रिया देताना जेमिनी एआय अॅपलच्या सिरीमध्ये सुधारणा करेल, मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की गुगलकडे आधीपासूनच अँड्राईड आणि चार्म आहे. मस्कची कंपनी एक्स एआय ग्रोक नावाचा एआय चॅटबॉट बनवते, जी थेट गुगलच्या जेमिनीशी स्पर्धा करते. मस्क आधीच अॅपल आणि ओपन एआय fिवरुद्ध कायदेशीर लढाई लढत आहे. या कंपन्या अॅप स्टोअरवर प्रतिस्पर्धी एआय सेवा ब्लॉक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे.
