For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अंधुक प्रकाशामुळे भारत अ विजयापासून वंचित

06:22 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
अंधुक प्रकाशामुळे भारत अ विजयापासून वंचित
Advertisement

वृत्तसंस्था, लिंकन

Advertisement

मंगळवारी येथे खेळाच्या शेवटच्या दिवशी अंधूक प्रकाशामुळे भारत अ संघाला विजयापासून वंचित व्हावे लागले. भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील चार दिवसांची ही अनधिकृत पहिली कसोटी अनिर्णीत अवस्थेत संपली.

या सामन्यात भारत अ संघाने न्यूझीलंड अ संघाला विजयासाठी 313 धावांचे आव्हान दिवले होते. तत्पूर्वी भारत अ संघाने दुसऱ्या डावात 516 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर न्यूझीलंड अ संघाच्या दुसऱ्या डावात भारत अ संघातील वेगवान गोलंदाज अकिब नबीने आपल्या 10 षटकांत 28 धावांत 3 गडी बाद केले. न्यूझीलंड अ संघाच्या फलंदाजांना नबीच्या गोलंदाजीवर खेळपट्टीवर अधिक राहणे कठीण गेले. अखेर न्यूझीलंड अ संघाने 9 बाद 187 धावा जमविल्या असताना अंधूक प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतल्याने न्यूझीलंड अ संघ संभाव्य पराभवापासून वाचला. शेवटच्या दिवशीच्या खेळातील 17 षटके बाकी असताना पंचांनी हा निर्णय घेतला. पुन्हा प्रकाशामध्ये सुधारणा होईल, अशी आशा भारतीय अ संघातील खेळाडूंना वाटत होती. पण ढगाळ वातावरणामुळे पुन्हा खेळ सुरू करता न आल्याने भारत अ संघाची निराशा झाली. आता उभय संघातील दुसरी अनाधिकृत कसोटी 31 ऑक्टोबर पासून ख्राईस्टचर्च येथे खेळविली जाणार आहे.

Advertisement

या सामन्यात भारत अ संघाने पहिल्या डावात 113 धावा जमविल्याने न्यूझीलंडने पहिल्या डावात 317 धावा जमवित 204 धावांची भक्कम आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर भारत अ संघाने 8 बाद 488 या धावसंख्येवरुन शेवटच्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांचा दुसऱ्या डाव 123 षटकात 516 धावांवर आटोपला. देवदत्त पडिक्कलने 199, साई सुदर्शन 91, यश राठोडने 66 तर वॉशिंग्टन सुंदरने 52 धावा जमविल्या. न्यूझीलंड अ तर्फे गिब्जसनने 80 धावांत 3 गडी बाद केले.

न्यूझीलंड अ संघाला विजयासाठी 313 धावांचे आव्हान मिळाले. पण अकिब नबीच्या अप्रतिम स्वींग गोलंदाजीसमोर न्यूझीलंड अ संघाचा कर्णधार मारीयु 2 धावांवर, रॉबिनसन शुन्यावर तर मॅथ्यु बॉईल 4 धावांवर बाद झाले. न्यूझीलंड अ संघाची यावेळी स्थिती 3 बाद 14 अशी केविलवाणी होती. सलामीच्या कर्टिस हिपेने चिवट फलंदाजी करत नाबाद 90 धावा जमविताना फॉक्सक्रॉप्ट समवेत चौथ्या गड्यासाठी 78 धावांची भागिदारी केली. त्यामध्ये फॉक्सक्रॉप्टचा वाटा 42 धावांचा होता. या जोडीने 20 षटके खेळून काढली. मुकेश चौधरीने फॉक्सक्रॉप्टला बाद केले. त्यानंतर आकाशदीपने सिमॉन किनेला बाद केले. न्यूझीलंड अ संघाने 55.3 षटकांत 9 बाद 170 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानतंर हिफे आणि लिनॉक्स या जोडीने तब्बल 10 षटके खेळून काढली. यानंतर खराब आणि अंधूक प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबविल्याने हा सामना अखेर अनिर्णीत राहिला. भारतीय संघातील यश राठोडने दोन्ही डावांत समाधानकारक फलंदाजी केली असून त्याचा निवड समिती आगामी कसोटी मालिकेसाठी निश्चितच विचार करेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 19 नोव्हेंबरपासून खेळविली जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक: भ्घरत अ प. डाव 113, न्यूझीलंड अ प. डाव 317, भारत  अ दु. डाव 123.1 षटकांत सर्वबाद 516 (पडिक्कल 199, साई सुदर्शन 91, यश राठोड 66, वॉशिंग्टन सुंदर 52, गिब्सन 3-80), न्यूझीलंड अ दु. डाव 9 बाद 187 (कर्टिस हिफे 90, फॉक्सक्रॉप्ट 42, अकिब नबी 3-28, पडिक्कल 2-11).

Advertisement
Tags :

.